दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डीन्होला बनावट पासपोर्टसाठी अटक


फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस
ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डीन्हो आणि त्याचा भाऊ रोबर्टरे याना दक्षिण अमेरिकन देश पेरुग्वे मध्ये बनावट पासपोर्ट वापरून प्रवेश केल्याबद्दल पेराग्वे पोलिसांनी अटक केली आहे. राजधानी असूसीयेनम मध्ये या दोघांची चौकशी सुरु असल्याचे समजते. येथून १५ किमी अंतरावरील याच अँड गोल्फ क्लब रिसोर्ट मध्ये हे दोघे एका मुलांच्या चॅरीटी कॅम्पेनमध्ये भाग घेण्यासाठी उतरले होते.


मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी ३९ वर्षीय रोनाल्डीन्हो आणि त्याचा ४५ वर्षीय भाऊ पेराग्वेला पोहोचले आणि या रिसोर्टमध्ये गेले तेव्हाच त्यांना पोलिसांनी अटक करून याच रिसोर्टमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. या ठिकाणी होणाऱ्या मुलांच्या चॅरीटी कॅम्पेन कार्यक्रमातच रोनाल्डीन्हो त्याच्या करिअरवर आधारित पुस्तकाचे प्रमोशन करणार होता.

पेराग्वेचे इंटरनॅशनल अफेअर मिनिस्टर असेवाडो या अटकेसंदाभात बोलताना म्हणाले, रोनाल्डीन्हो बद्दल आम्हाला खूप आदर आहे मात्र त्यानीही कायद्याचा आदर ठेवायला हवा.

Leave a Comment