जेम्स बॉंडच्या हातात दिसणार नोकिया ८.२


फोटो सौजन्य पत्रिका
एचएमडी ग्लोबलने नोकिया ८.२ हा नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली असून त्याच्या प्रमोशनसाठी थेट जेम्स बॉंड बरोबर भागीदारी केली आहे. जेम्स बॉंडच्या आगामी नो टाईम टू डाय चित्रपटात हा स्मार्टफोन बॉंडच्या हातात दिसेल. त्याचे फोटो सोशल मिडियावर आले असून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हे फोटो घेतले गेले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार नोकिया ८.२ फाईव्ह जी बरोबरच ५.२, ८.२, १.३ आणि सी २ हे स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर करणार होती. मात्र करोना फैलावामुळे हा इव्हेंट रद्द केला गेला. त्यामुळे आता हे फोन कंपनी लंडन मध्ये १९ मार्च रोजी होत असलेल्या इव्हेंट मध्ये सादर करणार आहे. फोनची फिचर्स स्पष्ट केली गेलेली नसली तरी गिकबेंचवर नोकिया ५.२ स्पॉट झाला आहे.

अन्य एका रिपोर्टवरून मिळालेल्या माहितीनुसार नोकिया ८.२ फाईव्ह जी साठी ६.२ इंची एलसीडी डिस्प्ले, क्वाड कॅमेरा सेटअप, सेल्फीसाठी ३२ एमपी कॅमेरा, ६ जीबी रॅम, अँड्राईड १० ओएस अशी फिचर्स दिली जातील. विशेष म्हणजे हे सर्व फोन मिडरेंज सेगमेंट मधील असतील आणि नोकिया ८.२ फाईव्ह जीची भारतातील किंमत साधारण ३७ हजाराच्या दरम्यान असेल.

Leave a Comment