नको त्या जागी हाताचा ठसा दिसल्याने ट्रोल झाली उर्वशी


राजकारणी म्हणा अथवा सेलिब्रेटी प्रत्येकजण आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सर्रास वापर करताना दिसतात, त्यामुळेच ते या प्लॅटफॉर्मवर दिवसातील बराच वेळ व्यतीत करतात. त्यातच त्यांच्यावर कधी कौतुकाचा तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नहेमीच संपर्कात असते. पण एका फोटोमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्वशीला ट्रोल व्हावे लागले आहे.


सध्या मालदीवमध्ये उर्वशी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर येथील एका समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीमधील फोटो पोस्ट केला आहे. उर्वशीने या फोटोला मालदीव हे स्वर्गासारखे असल्याचे कॅप्शन दिले आहे.उर्वशी या फोटोमध्ये स्काय ब्लू रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. हातात टोपी, केसात लाल रंगाचे फूल आणि डोळ्यावर गॉगल असा उर्वशीचा या फोटोतील लूक आहे.

पण आता ती या फोटोवरुन ट्रोल होताना दिसत आहे. उर्वशीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या कंबरेजवळ हाताच्या पंजाचा ठसा दिसत आहे. यावरुनच तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. या पोस्टखाली हा हाताचा ठसा कोणाचा आहे?, “कोणी मारला हा फटका? अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स दिसत आहेत.

Leave a Comment