या पाच देशांत मावळतच नाही सूर्य


किमान २४ तास पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी लागतो. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. आपण या ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि ती याच स्थितीत स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.

सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. पण याला जगातील पाच देश अपवाद ठरले असून ३ ते ४ महिने सूर्य यातील काही देशांत मावळतच नाही. त्‍याचीच खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कॅनडामधील लोकांना रात्र होण्याची दोन महिने वाट पहावी लागते. या देशात ५० दिवसाहून अधिक कालावधी सूर्य मावळण्यास लागतो.

नॉर्वे या देशात मे ते जुलै म्हणजेच ७६ दिवस सूर्य मावळत नाही. त्यामुळेच या देशाला लँड ऑफ द मिडनाईट सन असेही म्हटले जाते.

स्वीडन या देशात मे पासून ऑगस्ट या कालावधीत सूर्य अर्ध्या रात्री मावळतो आणि सकाळी ४.३० वाजता पुन्हा उगवतो. येथे तुम्ही अर्ध्या रात्री ही सूर्य किरणांचा आस्वाद घेऊ शकता.

आइसलँड हा उत्तर युरोपातील अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप देश असून येथे मे ते जून या महिन्यादरम्यान दिवसच असतो.

फिनलंड येथे देखील ७३ दिवसच सूर्य प्रकाशित असतो. येथील ७३ दिवस हे अविस्मरणीय असतात. ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

Leave a Comment