या ‘बाहुल्यांच्या हॉस्पिटल’मध्ये येण्यासाठी घाबरतात लोक


हे हॉस्पिटल रुग्णांसाठी नसून बाहुल्यांसाठी आहे. तुम्हाला या हॉस्पिटलची सत्यता माहिती आहे का? या रुग्णालयाला २०० वर्षांचा भयंकर इतिहास आहे. या ठिकाणाचे नाव हॉस्पिटल ऑफ हॉरर असे आहे. वास्तविक, मुलांच्या खेळण्यातील बाहुल्यांची दुरुस्ती येथे केली जाते. पण आता परिस्थिती अशी आहे की येथे येण्यासाठी भीती वाटते. तुम्हाला सांगू इच्छितो कि हे रुग्णालय पोर्तुगालमध्ये आहे. आहे. आता आपण विचार करत असाल कि मुलांच्या बाहुल्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण एवढे भयानक का आहे. तर याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो.

ख्रिसमसच्या निमित्ताने, पोर्तुगालमध्ये तुटलेल्या बाहुल्यांची दुरुस्ती करण्याची परंपरा आहे. म्हणून, १८३०च्या दशकात बनलेल्या बाहुल्यांच्या या हॉस्पिटलमध्ये वर्षोनुवर्षे हे काम केले जात आहे. सुमारे १८००च्या दरम्यान एक वृद्ध महिला या ठिकाणी औषध विकत असे. असे सांगितले जाते की येथून जाणाऱ्या मुलांच्या बाहुल्या येथे मोफत दुरुस्त केल्या जातात. काही काळानंतर या ठिकाणी बाहुली दुरुस्ती केंद्र सुरु करण्यात आले आणि त्यानंतर या हॉस्पिटलची स्थापना येथे झाली.

अशी देखील एक परंपरा आहे कि ज्यामध्ये आजी-आजोबा आपल्या बालपणाची खेळणी आपल्या नातवंडांना देण्यासाठी जपून ठेवत. यामुळे पोर्तुगालमधील हजारो बाहुल्या येथे दुरुस्तीसाठी येतात. पण या हॉस्पिटलच्या आतील रूप इतके भयानक आहे की लोक ते पाहताच घाबरतात. खर तर येथे शेकडो बाहुल्याच्या शरीराचे काही भाग असतात जसे हात-पाय, डोळे, चेहरे, केस येथे विखुरलेले असतात, जे बघून येथे येणाऱ्या लोकांचा थरकाप उडतो.

तुम्ही हे जाणून हैराण व्हाल कि हॉस्पिटलमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या बाहुल्यांची रुग्णालयातील रुग्णांप्रमाणेच देखभाल केली जाते. एवढेच नव्हे तर, पांढऱ्या वेशभूषासह डॉक्टरांचे कार्य करणारे येथे दुरुस्तीसाठी लागणारी अवजारे घेऊन असतात.

Leave a Comment