‘एक व्हिलन’च्या सिक्वेलमध्ये दिशा पटनीची एन्ट्री


लवकरच मोहित सुरी दिग्दर्शित आणि सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख श्रद्धा कपूर अभिनीत ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. निर्माती एकता कपूर आणि भूषण कुमार या सिक्वेलसाठी एकत्र आले असून आता अभिनेत्री दिशा पटनीची यामध्ये एन्ट्री झाली आहे. आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये दिशाने एक खास फोटो शेअर केला आहे.

श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांची २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ चित्रपटात मुख्य भूमिका होती. आता सिक्वेलमध्ये आदित्य रॉय कपूर, दिशा पटनी आणि जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली असून हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ रोजी रिलीज होणार आहे. दिशा आणि आदित्य अलिकडेच मोहित सुरीच्या ‘मलंग’ चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Comment