नवी दिल्ली : देशातील कोरोना पीडित रुग्णांची संख्या 29 झाली असून कोरोनाने भारतातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत दिल्लीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कोरोना व्हायरस; दिल्लीतील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद
कोरोना व्हायरसचा देशातील धोका पाहता, व्हायरस जास्त पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिले आहेत. सरकारी, खासगी अशा सर्व शाळांचा यामध्ये समावेश असल्याचे सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णामुळे आग्र्यातील 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर जयपूर येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन पर्यकांच्या ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात 3 कोरोना पीडित त्या व्हायरसच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.