ऋषिकेश मध्ये जाँटी ऱ्होडसची गंगा डुबकी


फोटो सौजन्य जागरण
क्रिकेट क्षेत्रात जगातील सर्वश्रेष्ठ फिल्डर असा बहुमान प्राप्त असलेल्या द. आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होडसवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. बुधवारी जाँटी ऱ्होडसने त्याच्या ट्विटर अकौंटवर गंगास्नान करत असल्याचा फोटो शेअर केला असून त्याखाली दिलेल्या कॅप्शन मध्ये पवित्र गंगेच्या थंडगार पाण्यात डुबकी मारण्याचे शारीरिक तसेच अध्यात्मिक फायदे मोठे आहेत असे म्हटले आहे. त्यात त्याने मोक्ष, ऋषिकेश आणि इंटरनॅशनल योग फेस्टिव्हल या शब्दाना हॅशटॅग केले आहे.

जाँटी ऱ्होडसचा हा फोटो एकदम भारतीय स्टाईलमध्ये आहे. तो खांद्याइतक्या पाण्यात उभा असून त्याने नमस्काराच्या पोझ मध्ये हात जोडले आहेत. ५० वर्षीय जाँटी सध्या आयपीएलच्या १३ व्या सिझनसाठी भारतात आला असून तो यंदा किंग्स इलेव्हन पंजाब टीम च्या फिल्डिंग कोच आहे. त्यापूर्वी त्याने ८ वर्षे मुंबई इंडीयन्ससाठी फिल्डिंग कोच म्हणून काम केले असून त्याच्या काळात तीन वेळा मुंबईने आयपीएल खिताब जिंकला आहे.

द. आफ्रिकेच्या या खेळाडूने ५२ कसोटी, २४५ वनडे खेळल्या आहेत. त्याच्यावर भारताचा मोठा प्रभाव असून २०१६ मध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलीचे नाव त्याने इंडिया ठेवले आहे. भारताची संस्कृती, परंपरा आणि वारसा याची तो नेहमीच तारीफ करतो.

Leave a Comment