पंतप्रधान मोदी राहणार होली मिलन पासून दूर


फोटो सौजन्य न्यूजट्री
या आठवड्यात होलीचा मोठा सण देशभरात साजरा होतो आहे. मात्र देशात वाढलेला करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन या सणानिमित्त होणाऱ्या होली मिलन कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे तसेच याच कारणास्तव राष्ट्रपती भवन येथेही हा कार्यक्रम साजरा होणार नसल्याचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

होली मिलन मध्ये एकमेकांच्या अंगावर रंगाची उधळण करून मिठाई खिलविली जाते. या कार्यक्रमात मोठी गर्दी होते मात्र करोनाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक गर्दी टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. १० मार्च रोजी होली मिलन आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एक पत्रक जारी केले असून करोना पासून सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले आहेत. त्यात सार्वजनिक गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे.

देशात करोना बाधितांची संख्या वाढत चालली असून सरकारने या साथीच्या निपटाऱ्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी या तयारीवर वैयक्तिक लक्ष ठेऊन असल्याचे समजते. दरम्यात ३७ संशयिताना पुण्यात राष्ट्रीय जीव विज्ञान संस्थान मध्ये तपासणीसाठी पाठविले गेल्याचेही वृत्त आहे.

Leave a Comment