या टिप्स वापरल्यातर तुमची गाडी उन्हाळ्यातही राहिल ‘कुल’

उन्हाळा आता सुरू झाला आहे. उष्णता देखील वाढत चालली आहे. त्यामुळे गरमीमध्ये विना एसी कार चालवणे अवघड होते. उन्हाळ्यात देखील गाडीला थंड ठेवण्यासाठी काही टिप्स वापरता येतील. त्याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

उन्हात पार्क करू नये –

अनेकदा पाहिला मिळते की कार दिवसभर उन्हात पार्क केली जाते. मात्र असे केल्याने फ्यूल टँकमधील पेट्रोल आपले रुप बदलून गॅसमध्ये रुपांतरित होते व हवेत उडून जाते. हे खूप कमी प्रमाणात होत असले तरी यामुळे फ्यूल वाया जाते. त्यामुळे गाडी नेहमी थंड ठिकाणी पार्क करावी.

Image Credited – Amarujala

विंडो शेड्सचा वापर –

कार पार्क करताना सर्व खिडक्या स्क्रीनसह कव्हर कराव्यात. या स्टिक ऑन स्क्रीन कोणत्याही कार एक्सेसरी शॉपमध्ये मिळतात. याची किंमत देखील अधिक नाही. या शेड्समुळे तुमच्या कारचे इंटेरियर अधिक वेळ थंड राहील.

Image Credited – Amarujala

कारला व्हेंटिलेट करावे –

कारमध्ये बसल्या बसल्या एसी सुरू केल्याने एसीवर दबाव पडतो व हवेला थंड करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे सर्वात प्रथम विंडो खाली घ्यावी. एसी कंट्रोलला फ्रेश एअर मोडवर चालू करावे व ब्लोअरवर स्विच करावे. दोन मिनिटांनंतर एसीवर स्विच करावे व कारच्या खिडक्या रोल कराव्यात. त्यानंतर एसीला रीसर्क्युलेशन मोडवर बदलावे. यामुळे हवा वेगाने थंड होते.

Image Credited – Amarujala

टायर्सची काळजी –

उन्हाळ्यात टरमॅक रस्ते गरम होतात. ज्याचा परिणाम टायरवर होतो. टायरमध्ये साध्या हवेच्या जागी नायट्रोजनचा वापर करावा. यामुळे ओव्हरहिटिंग कमी होण्यास मदत होते.

Image Credited – Amarujala

एसीची रेग्युलर सर्व्हिसिंग –

उन्हाळ्यात कारच्या एसीला सर्व्हिस करणे गरजेचे आहे. जर एसी कूलिंग व्यवस्थित करत नसेल तर त्यातील गॅस संपला आहे. एसीच्या ट्यूब आणि वॉल्वची देखील सफाई करावी. तसेच एसीचा सर्वात महत्त्वाचा पार्ट कंडेंसरची देखील तपासणी करावी.

Image Credited – Amarujala

कूलेंटचे योग्य प्रमाण –

उन्हाळ्यात गाडी त्वरित गरम होणे सर्वसामान्य गोष्ट आहे. यासाठी सर्वात गरजेचे कूलेंटला योग्य प्रमाणात असणे. हे इंजिनला थंड ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. लाँग ड्राईव्हला जात असाल तर कूलेंट तपासावे व सोबत कूलेंटची एक बाटली देखील ठेवावी. ओव्हरहिटमुळे इंजिन सीझ होण्याची देखील शक्यता असते.

Leave a Comment