अश्लील उद्योग मित्रमंडळामधून गायब झाली ‘सविता भाभी’


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चित्रपटातील सविता भाभीमुळे चर्चेत आला. पण आता चित्रपटातून ‘सविता भाभी’ हे नावच गायब होणार आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या टीमने काही दिवसांपूर्वी हटके पद्धत वापरत चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यानंतर पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ही सविता भाभी कोण अशी उत्सुकता निर्माण झाली. पण या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांना सविता भाभी कोण हे समजले. पण या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन आता वाद निर्माण झाला आहे. हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचे सांगत निलेश गुप्ता यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली होती. त्यानुसार तब्बल 58 ठिकाणी ‘सविता भाभी’ या नावाचा उल्लेख म्यूट करावा लागणार आहे. निलेश गुप्ता यांनी चित्रपटातील पात्र हे कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे म्हणत त्यांनी कायदेशीर नोटीस बजावली होती.

Leave a Comment