भारतातील या गावात बोलली जाते जगावेगळी भाषा

जगभरात अशा अनेक जागा आहेत, जेथील रहस्य आजही आश्चर्यचकित करतात. असेच एक ठिकाण हिमाचल प्रदेशमध्ये आहे. येथील एक गाव अशी भाषा बोलते, जी येथील गावातील लोकांना सोडून इतर कोणालाच समजत नाही.

या गावाचे नाव मलाणा असून, हे चारी बाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. जवळपास 1700 लोकसंख्या असलेले हे गाव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

Image Credited – Amarujala

या गावात पोहचणे अवघड आहे, कारण येथे जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगरातून वाट काढत येथे पोहचावे लागते. पार्वती घाटातील जरी गावापासून येथे पोहचण्यास 4 तास लागतात.

Image Credited – Amarujala

या गावासंदर्भात अनेक रहस्यमयी व ऐतिहासिक किस्से आहेत. येथील लोक स्वतःला यूनानचा प्रसिद्ध राजा सिंकदरचे वंशज सांगतात. सांगण्यात येते की, जेव्हा सिंकदरने भारतावर हल्ला केला, त्यावेळी त्याचे काही सैनिक येथे थांबले होते. येथील लोक स्वतःला त्याच सैनिकांचे वंशज सांगतात. मात्र अद्याप हे सिद्ध झालेले नाही. सिंकदरच्या काळातील अनेक गोष्टी या गावात सापडल्या आहेत. त्या काळातील एक तलवार देखील मंदिरात ठेवली असल्याचे सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

येथील लोक कनाशी भाषा बोलतात. तेथील लोक या भाषेला पवित्र मानतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही भाषा येथील लोकांव्यतिरिक्त इतर कोणालाच समजत नाही. या भाषेला बाहेरील लोकांना शिकवले जात नाही.

Image Credited – Amarujala

येथील लोक जमलू देवाची पूजा करतात. हिंदू पुराणांमध्ये जमलू देवाला जमदग्नी ऋषि नावाने ओळखले जाते. या गावात दोन मंदिर असून एक जमलू देवता व दुसरे त्यांची पत्नी रेणूका देवीचे आहे. या मंदिराला बाहेरील व्यक्तीने स्पर्श केल्यास त्याला 3500 रुपये दंड भरावा लागतो.

Image Credited – Amarujala

या गावातील लोक बाहेरील व्यक्तीस हात मिळवण्यास आणि स्पर्श करण्यास देखील नकार देतात. मात्र येथील तरूण पिढी या गोष्टींना मानत नाही.

विशेष म्हणजे येथे लग्न देखील गावातल्या गावातच होते. जर एखाद्याने गावाच्या बाहेर लग्न केले तर त्याला समाजातून बेदखल करण्यात येते. येथील हशीश (चरस) खूप प्रसिद्ध आहे. गावातील लोक याची विक्री करतात. येथील लहान मुले देखील याचा व्यवसाय करतात.

Leave a Comment