जिओने 5जी टेस्टिंगसाठी सरकारकडे मागितली परवानगी

भारतात अद्याप 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला नाही. मात्र टेलिकॉम कंपन्या याच्या तयारीत आहेत. रिलायन्स जिओने देखील 5जी टेक्नोलॉजी विकसित केली असून, याच्या टेस्टिंगसाठी कंपनीने सरकारकडे परवानगी मागितली आहे.

जिओने दावा केला आहे की, 5जी नेटवर्कसाठी कोणाचीही मदत घेण्यात आलेली नसून, कंपनीने स्वतः 5जी नेटवर्कला डिझाईन केले आहे.

सांगण्यात येत आहे की, कंपनीने स्वतः 5जी तंत्रज्ञान विकसित केले असले तरी देखील चाचणी यशस्वी झाल्यानंतर 5जी उपकरणांचे डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे काम दुसऱ्या कंपन्यांना देण्यात येईल. यासाठी जिओ सॅमसंग, ह्युवाई, नोकिया आणि एरिक्सन या कंपन्यांची मदत घेऊ शकते. सध्या जिओसाठी 4जी उपकरण सॅमसंग पुरवत आहे.

Leave a Comment