या टिप्स वापरून वाढवा तुमच्या कारचे मायलेज

पेट्रोल आणि डिझेलच्या भाव वाढत आहेत, तसतसे मायलेजच्या बाबतीत लोकांच्या मनात चिंता वाढत जाते. चालक अनेक गोष्टींकरून देखील त्यांना अधिक मायलेज मिळत नाही. आज अशाच काही टिप्स जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही गाडीचे मायलेज वाढवू शकता.

Image Credited – Amarujala

इंजिन नेहमी ट्यून ठेवा –

जर तुमचे इंजिन अधिक धुर सोडत असेल, तर त्याला ट्यूनिंगची गरज आहे. असे केल्याने तुमच्या कारचे मायलेज 4 टक्क्यांनी वाढेल. जर तुम्ही कारचे ऑक्सिजन सेंसर बदलले तर मायलेज 40 टक्क्यांनी वाढते.

Image Credited – Amarujala

टायरमधील हवा –

चांगल्या मायलेजसाठी गाडीच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणे गरजेचे आहे. तुम्ही टायरमध्ये नायट्रोजन देखील भरवू शकता. टायर्सची कंडिशन देखील चांगली असणे गरजेचे आहे.

Image Credited – Amarujala

चुकीचे इंजिन ऑइल –

इंजिन ऑइल कार इंजिनचा महत्त्वाचा भाग आहे. इंजिन ऑइलचा वापर करण्यापुर्वी कारमध्ये कोणत्या ग्रेडचे ऑइल वापरले जात आहे, याची माहिती घ्यावी. चुकीच्या ऑइलमुळे मायलेज कमी मिळते व पार्ट्सचे वय देखील घटते.

Image Credited – Amarujala

इंधन –

इंधन भरताना चांगल्या पेट्रोल पंपावरूनच भरावे. चांगल्या गुणवत्तेच्या तेलामुळे इंजिनचे परफॉर्मेंस वाढते. तसेच फ्यूल इंजेक्टर्स नॉझल देखील साफ ठेवावे.

Image Credited – Amarujala

वेगावर नियंत्रण –

अनेकांना असे वाटते की गाडी वेगाने चालवल्याने अधिक मायलेज मिळते. मात्र हे खोटे आहे. गाडीच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. वारंवार एसीलरेट केल्याने इंजिन मायलेज कमी होते.

Image Credited – Amarujala

क्लचचा अधिक वापर –

जर तुम्ही क्लचवर पाय ठेऊन गाडी चालवत असाल तर आताच सावध व्हा. यामुळे नुकसान होऊ शकते व क्लच प्लेट बदलावी लागू शकते. गरज पडल्यासच क्लच प्लेटचा उपयोग करावा.

Image Credited – Amarujala

योग्य गिअरमध्ये गाडी चालवावी –

मॅन्युअल ट्रांसमिशन असणाऱ्या गाडीत गिअर टाकताना काळजी घ्यावी. योग्य स्पीडवर योग्य गिअरचा वापर करावा.

Image Credited – Amarujala

एअर कंडिशनचा अतिरिक्त वापर –

जर तुम्ही एसीचा अधिक वापर करत असाल, तर तुमची गाडी कमी मायलेज देईल. एसीला पॉवर इंजिनद्वारे मिळते. त्यामुळे इंजिनवर अधिक दबाव पडल्याने मायलेजवर देखील त्याचा परिणाम होतो.

Image Credited – Amarujala

समान गतीवर गाडी चालवावी –

जर तुम्हाला अधिक मायलेज हवे असेल तर गाडी एकाच समान गतीवर चालवावी. 80च्या स्पीडने हायवेवर ड्रायव्हिंग करू शकता, याने इंधन कमी खर्च होते.

Image Credited – Amarujala

जास्त सामान, कमी मायलेज –

गाडीतील अधिक वजनाने गाडीच्या इंजिनवर परिणाम होतो. ज्यामुळे मायलेज देखील कमी मिळते. त्यामुळे गाडीत अनावश्यक सामान घेऊन प्रवास करू नये.

Leave a Comment