या पठ्ठ्याने जुगाड करत बनवली 100 किमी मायलेज देणारी बुलेट

अनेकांची रॉयल एनफिल्डची बुलेट ही गाडी घेण्याची इच्छा असते. मात्र गाडीच्या मायलेजमुळे अनेकजण हात आखडता घेतात. मात्र हीच बुलेट 100 चे मायलेज देते, असे तुम्हाला कोणी सांगितल्यावर ? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र एका पठ्ठ्याने जुगाड करत बुलेटला असे मॉडिफाय केले की गाडी 100 किमी प्रती लीटर मायलेज देत आहे.

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील मॅकेनिक नौशाद अंसारीने ही कमाल केली आहे. नौशादला बुलेट राजा नावाने देखील ओळखले जाते.

नौशाद स्वतः बाईक्स मॉडिफाय करतो. एका बाईकला मॉडिफाय करण्यासाठी तो 25 ते 30 हजार रुपये घेतो. मॉडेलच्या हिशोबाने किंमत कमी-अधिक होते.

नौशादने सांगितले की, तो बाईकच्या मायलेजसोबत स्पीड देखील वाढवतो. जुन्या मॉडेल्सच्या बाईकची युवकांमध्ये क्रेझ आहे. अनेक युवक जुनी बुलेट खरेदी करतात व आपल्या आवडीनुसार त्यात पार्ट्स लावतात. ज्यामुळे ती बाईक जुन्या मॉडेलप्रमाणे दिसेल.

त्याने सांगितले की, सध्या बाजारात येणाऱ्या बुलेटच्या सायलेंसरमधून जास्त आवाज येत नाही. मात्र त्यांच्याकडे जे लोक बुलेट मॉडिफाय करण्यासाठी येतात, त्यांना अधिक आवाज येणारे सायलेंसर हवे असतात.

Leave a Comment