निवड समितीच्या शर्यतीतून अजित आगरकरचा पत्ता कट!


मुंबई – भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीसाठी तीन व्यक्तींना बीसीसीआयच्या नव्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. दोन पदांसाठी ही मुलाखत असणार आहे. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, फिरकीपटू सुनील जोशी आणि समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन, राजेश चौहान व हरविंदर सिंग यांचा यामध्ये समावेश आहे.

ही माहिती सीएसी सदस्य मदन लाल यांनी या बैठकीची दिली. तब्बल ४४ अर्ज या दोन पदांसाठी दाखल झाले होते. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही यामध्ये समावेश होता. त्याचबरोबर आगरकरची निवड निश्चितही मानली जात होती. पण त्याला यातून वगळण्यात आले आहे.

माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे बीसीसीआयने या दोन पदांसाठी अर्ज मागवले होते. क्रिकेट सल्लागार समिती यांची निवड करण्यासाठी नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांच्यासह माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment