इजिप्त मध्ये समुद्रात सापडले प्राचीन मंदिर


फोटो सौजन्य कॅच न्यूज
सुमारे १२०० वर्षे जुने ग्रीक मंदिर मुस्लीमबहुल इजिप्त देशात समुद्राच्या तळाशी संशोधकाना सापडले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तांब्याची नाणी, दागिनेही मिळाले आहेत. इजिप्त मधील हेराक्लीऑन हे ठिकाण हजारो वर्षापूर्वी त्सुनामीमुळे समुद्रात बुडाले होते. त्या काळात हे मंदिराचे शहर म्हुणून प्रसिध्द होते इतकेच नव्हे तर इजिप्तची आर्थिक राजधानी म्हणून हे शहर विकसीत केले गेले होते असे पुरातत्व तज्ञांचे म्हणणे आहे.


पुरातत्व तज्ञ डॉ.फेक्गिडीओ यांनी १२ वर्षांपूर्वी याच जागी फ्रेंच युध्दनौकाचा शोध लावला होता त्या १८ व्या शतकातल्या होत्या. मंदिराच्या शोध चार वर्षाच्या सततच्या संशोधनातून लागला आहे. या ठिकाणी प्राचीन शंख, शिंपले, क्रोकरी, नाणी, दागिने, भांडी अश्याही वस्तू सापडल्या आहेत. राजा क्लोडीयस टॉलमी द्वितीय याच्या शासन काळात हे शहर भरभराटीला आले होते. सध्या हे शहर अबू कीर खाडी या नावाने ओळखले जाते. याच राजाने इजिप्त मध्ये अनेक मंदिरे बांधली होती.

Leave a Comment