करोनासाठी रामदेवबाबांचा स्वदेशी मंत्र


फोटो सौजन्य वनइंडिया
भारतात करोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आले आहेत. मात्र या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी योगगुरू रामदेवबाबा यांनी स्वदेशी मंत्र दिला असून करोनामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. झी न्यूजला या संदर्भात त्यांनी एक मुलाखत दिली आहे.

रामदेवबाबांच्या म्हणण्यानुसार करोनासाठी अजून जगात कोणतीही प्रभावी लस तयार झालेली नसली तरी आयुर्वेदामुळे या रोगापासून आपण आपला बचाव करू शकतो. त्यासाठी नियमाने कपालभाती, अनुलोम विलोम आणि सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे. यामुळे फुफुसांची ताकद वाढते आणि संक्रमणाचा धोका कमी होतो. करोना हा प्राण्यापासून पसरलेला विषाणू आहे तो प्रदूषण किंवा डासांमुळे पसरलेला विषाणू नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे त्याच्या पासून दूर राहणे आणि आपली प्रतिकार शक्ती वाढविणे यावर भर द्यायला हवा.

त्याचबरोबर गुळवेल म्हणजे गिलोयचा काढा सर्व कुटुंबाने घेतला तर करोनाची भीती राहणार नाही. गुळवेल अनेक रोगात उपयुक्त असून ही वनस्पती कुठेही मिळू शकते. स्वाईनफ्लू, डेंग्यू सारख्या आजारातही गुळवेल अतिशय उपयुक्त ठरलेली आहे. त्यामुळे गुळवेलीचे तुकडे पाण्यात घालून उकळवून ते पाणी गाळून प्यायले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गाची भीती राहत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment