महिला दिनी मोदींची सोशल मीडिया खाती महिलांच्या ताब्यात


नवी दिल्ली – आपले सोशल मीडिया खाते बंद करण्याबाबत विचार करत असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केले होते. आज ट्विट करत यामागचे गुपित मोदींनी उघड केले आहे. येत्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्यासाठी एक अभियान राबवले जाणार आहे. मोदींची सोशल मीडिया खाती महिला दिनी महिलांना चालवण्यास देण्यात येणार असल्याचे म्हणत मोदींनी खाते बंद करण्यामागील घोषणेचे कारण उघड केले आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी महिला दिनी स्त्री शक्तीला आपले सोशल मीडिया खाते एक दिवसासाठी समर्पित करणार आहेत. #SheInspiresUs म्हणजेच ‘ती आम्हाला प्रेरणा देते’, असे नाव या अभियानाला देण्यात आले आहे. देशवासियांना या अभियानांतर्गत महिला कर्तुत्वाच्या प्रेरणादायक कथा शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर त्यांनी महिलांसोबत सर्व देशवासियांना #SheInspiresUs टॅगखाली स्टोरी शेअर करण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर राबवण्यात येणार आहे. मोदींनी ट्विटमध्ये यासंबधीचा व्हिडिओही पोस्ट करू शकता, असे देखील म्हटले आहे. ज्या एन्ट्री निवडल्या जातील, त्या एक दिवसासाठी मोदींचे खाते ‘टेक ओव्हर’ करतील, असे यामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment