अडचणीच्या काळात महिलांसाठी हे अ‍ॅप ठरू शकतात मदतगार

महिलांची सुरक्षा हा आज महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जात आहे. आज अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊया, जे अडचणीच्या स्थितीत मदतगार सिद्ध होऊ शकतात.

Image Credited – Amarujala

सेफ्टीपीन अ‍ॅप –

या अ‍ॅपला खास महिलांच्या सुरक्षेसाछी बनविण्यात आलेले आहे. या अ‍ॅपमध्ये यूजरला जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जेंसी कॉन्टॅक्ट नंबर आणि सेल्फ लोकेशन सारखे अनेक फीचर्स मिळतील. यात युजर्स सुरक्षित व असुरक्षित ठिकाणांची माहिती मिळवू शकतात. हे अ‍ॅप इंग्रजी व हिंदी भाषा सपोर्ट करते.

Image Credited – Amarujala

हिम्मत प्लस अ‍ॅप –

दिल्ली पोलिसांनी या अ‍ॅपला खास महिलांसाठी बनवले आहे. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात प्रथम दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर रजिस्टर करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन मिळेल. ज्यातद्वारे आणीबाणीच्या वेळी युजरचे लोकेशन, ऑडिओ आणि व्हिडीओ थेट पोलीस कंट्रोल रूमपर्यंत पोहचेल.

Image Credited – Amarujala

वूमन सेफ्टी अ‍ॅप –

या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे अडचणीच्या वेळी युजरचा 45 सेकंदाचा संदेश, व्हिडीओ आणि लोकेशन इमर्जेंसी नंबरवर पाठवता येतात.

Image Credited – Amarujala

शेक टू सेफ्टी अ‍ॅप –

या अ‍ॅपमध्ये संदेश फोनला हलवून पॉवर बटनाला 4 वेळा दाबून इमर्जेंसी ननंबरवर पाठवता येतात. या फीचरला तुम्ही बंद देखील करू शकतात.

 

Image Credited – Amarujala

बीसेफ अ‍ॅप –

या अ‍ॅपमध्ये युजर्सला एसओएस आणि लोकेशन शेअरिंग सारखे फीचर्स मिळतील. सुरक्षेच्या दृष्टीने हे अ‍ॅप महत्त्वाचे आहे. हे सर्व अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.

Leave a Comment