ब्रिटनमध्ये मागील 300 वर्षांपासून एका हटके शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या शर्यतीमध्ये पतीला पत्नीला पाठीवर घेऊन धावावे लागते. 400 मीटरची ही शर्यत नुकतीच ब्रिटनच्या डॉर्किंग येथे पार पडली. यावेळी या शर्यतीमध्ये 150 पतींनी भाग घेतला होता.
या ठिकाणी चक्क पत्नीला खांद्यावर घेऊन पुर्ण करतात शर्यत
या रेसमध्ये भाग घेण्यासाठी महिलेचे वजन कमीत कमी 50 किलो असणे आवश्यक आहे. खास गोष्ट म्हणजे ही शर्यत जिंकण्यासाठी महिला अनेक महिने आधीपासूनच वजन कमी करतात.
या शर्यत जिंकणाऱ्या स्पर्धकाला ट्रॉफी आणि 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ही स्पर्धा काही वर्षांपुर्वी बंद करण्यात आली होती. मात्र 13 वर्षापुर्वी या स्पर्धेला पुन्हा सुरू करण्यात आले. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश लोकांना एका ठिकाणी जमवून आनंद साजरा करणे हाच आहे.