दररोज शेकडो लोकांच्या पोटाची खळगी भरते ही व्यक्ती

भुकेल्यांना अन्न द्यावे, असे आपल्याकडे म्हटले जाते. एखाद्या उपाशी पोटी व्यक्तीला जेवायला घालणेच खरे पुण्य असते. तामिळनाडूमधील 63 वर्षीय बालाचंद्र हे मागील दीड वर्षांपासून असेच पुण्याईचे काम करत आहेत.

तुतूकूडी जिल्ह्यातील बालाचंद्र मागील दीड वर्षांपासून दररोज 150 आदिवासींना जेवायला घालत आहेत. बालाचंद्र यांनी 60 वर्षांपर्यंत स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. आता ते दररोज जिल्ह्यातील दुर्गम भागातील पानप्पल्ली, कोंडानुर, जम्बुकंडी, कुट्टपल्ली आणि थेक्कालूर येथे जाऊन गरीबांना जेवण वाटतात. दररोज ते 11 ते 12 यावेळी तेथील लोकांना अन्न वाटत असतात.

एवढेच नाही तर बालाचंद्र सर्व कुटुंबाना महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पालमलाई येथे 5-5 किलो तांदूळ आणि 1-1 किलो डाळ देतात. जे लोक वृद्ध आणि आजारी पडल्यामुळे कामाला जाऊ शकत नाही, अशा लोकांची बालाचंद्र मदत करतात.

बालाचंद्र म्हणाले की, मी आयुष्यातील 60 वर्ष कुटुंब आणि कामाला दिले. खूप पैसे कमवले. आता मी व्यवसाय सोडला आहे व कुटुंबाच्या जबाबदारीतून देखील मुक्त आहे. आता मी स्वतःला दिलेले वचन पुर्ण करत आहे.

रिपोर्टनुसार, बालाचंद्र दररोज खाण्यावर 6 हजार रुपये खर्च करतात. त्यांना यासाठी 14व्या शतकातील संत पत्तीनाथर यांच्यापासून प्रेरणा मिळाली.

Leave a Comment