गाव-शहरातील रस्त्यांसाठी या आहेत सर्वोत्तम स्कूटर

बाजारत दररोज नवनवीन स्कूटर लाँच होत आहेत. सध्या लाँच होणाऱ्या स्कूटरमध्ये बीएस6 मानक इंजिन देण्यात येत आहे. जर तुम्ही देखील नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशाच काही खास स्कूटरबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर कोणीही व कोणत्याही खडतर रस्त्यावर करता येईल.

या स्कूटरमध्ये सुझुकी बर्गमॅन, होंडा एक्टिवा 125, हिरो डेस्टिनी 125, यमाहा फसिनो एफआय आणि सुझुकी एस्सेस 125 या स्कूटर्सचा समावेश आहे. या स्कूटर्सला असे डिझाईन करण्यात आले आहे की, महिला, मुली आणि वृद्ध व्यक्तींना देखील आवडेल.

Image Credited – Amarujala

सुझुकी बर्ममॅन स्ट्रीट –

या स्कूटरमध्ये BS6 कंप्लाइंट 124 सीसी, 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड, फ्यूल इंजेक्शन, 2-वॉल्व, SOHC इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6750 आरपीएमवर 8.7ps पॉवर आणि 5500 आरपीएमवर 10Nm  टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 77,900 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

होंडा एक्टिवा 125 –

होंडा एक्टिवा 125 स्कूटरमध्ये BS-6 मानक 124 सीसी, फॅन-कूल्ड, 4-स्ट्रोक, एसआय इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6,500 आरपीएमवर 8.1 bhp पॉवर जनरेट करते.  या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 67,490 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

यमाहा फसिनो 125 एफआय –

या स्कूटरमध्ये BS-6 मानक एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 2-वॉल्व, फ्यूल इंजेक्शन इंजिन देण्यात आले असून, याचे इंजिन 6500 आरपीएमवर 8.2 PS पॉवर आणि 5000 आरपीएमलर 9.7 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यमाहा फसिनो 125 एफआयची किंमत 66,430 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

हिरो डेस्टिनी 125 –

या स्कूरटची किंमत 64,310 रुपये असून, यामध्ये देखील बीएस6 मानक इंजिन देण्यात आलेले आहे. यामध्ये 125 सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 7000 आरपीएमवर  9 Bhp पॉवर आणि 5500 आरपीएमवर 10.4 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Image Credited – Amarujala

सुझुकी एएक्सेस 125 –

सुझुकी एएक्सेस 125 स्कूटरमध्ये BS6 कंप्लाइंट  124 सीसीचे 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 2-वॉल्व SOHC इंजिन मिळेल. हे इंजिन 6750 आरपीएमवर 8.6 Bhp पॉवर आणि 5500 आरपीएमवर 10 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची किंमत 64,800 रुपये आहे.

Leave a Comment