नेमके कोणते डिव्हाईस आहे शशी थरुर यांच्या गळ्यात

आपल्या इंग्रजी आणि लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असणारे काँग्रेस नेते शशी थरूर सध्या एका खास गॅजेटमुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर थरूर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये त्यांच्या गळ्यात लटकलेले खास डिव्हाईस तुम्ही पाहू शकता. या खास डिव्हाईसबद्दल जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

शशी थरूर यांच्या गळ्यातील हे गॅजेट एक एअरफ्यूरीफायर आहे. या खास डिव्हाईसचे नाव AirTamer असून, हे सोबत घेऊन फिरता येणारे एअरफ्यूरीफायर आहे. जर तुमच्याकडे हे एअरटॅमेर असेल, तर तुम्हाला कोणत्याही अँटी पॉल्यूशन मास्क अथवा सॅनेटाइजरची गरज नाही. हे एअरफ्यूरीफायर तीन फुटांपर्यंतची हवा साफ करते.

Image Credited – Amarujala

ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार, हे एअरफ्यूरीफायर धोकादायक वायूकणांना तुमच्याजवळ देखील येऊ देत नाही. त्यामुळे तुम्हाला एकदम स्वच्छ व ताजी हवा मिळते. या डिव्हाईसला तुम्ही सहज चार्ज करू शकता. हे गॅजेट बॅक्टेरियांना देखील मारण्यास सक्षम आहे.

Image Credited – Amarujala

एकदा चार्जिंग केल्यावर हे डिव्हाईस 150 तासांपेक्षा अधिक बॅकअप देते. याला मायक्रो यूएसबी केबलने चार्ज करता येते. या डिव्हाईसची किंमत 8,499 रुपये असून, याचे वजन केवळ 50 ग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की, याचे फिल्टर बदलण्याची देखील गरज नाही.

Leave a Comment