ओप्पोने भारतात लाँच केले ‘आर्थिक सेवा’ देणारे अ‍ॅप

शाओमी आणि रियलमीनंतर आता प्रतिस्पर्धी कंपनी ओप्पोने देखील भारतात वित्तीय सेवांसाठी कॅश अ‍ॅप (Kash App) भारतात लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्स सहज म्युच्युअल फंड, विमा आणि कर्जासारख्या आर्थिक सेवा घेऊ शकतात. सोबतच या अ‍ॅपद्वारे युजर्सला स्मार्टफोन खरेदी करण्याची देखील सुविधा मिळेल.

कंपनीने या वित्तीय अ‍ॅपसाठी अनेक बँकांसोबत भागिदारी केली आहे. ऑप्पोचे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध आहे.

ओप्पोच्या नवीन येणाऱ्या फोनमध्ये हे अ‍ॅप आधीपासूनच प्री-लोडेड मिळेल. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना कंपनीचे प्रोडक्ट देखील स्वस्तात खरेदी करता येतील.

मागील वर्षी चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने देखील आपला एमआय पे यूपीआय अ‍ॅप लाँच केला होता. या अ‍ॅपद्वारे ग्राहक ऑनलाईन व्यवहार करू शकतात.

Leave a Comment