टॅटूच्या नादात गमावली या मुलीने दृष्टी

टॅटू काढणे व इतरांपेक्षा वेगळे दिसण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र याच टॅटूच्या नादात एका मॉडेलला आपले डोळे गमवावे लागले आहेत. पोलंडमध्ये राहणाऱ्या अ‍ॅलेक्झँड्रा सॅडोस्काला डोळ्यांना टॅटू काढण्याच्या नादात आपला एक डोळा गमवावा लागला आहे व दुसऱ्या डोळ्याने देखील तिला लवकरच पाहता येणार नाही.

अ‍ॅलेक्झँड्राला रॅप आर्टिस्ट पोपेकप्रमाणे डोळ्यांना टॅटू करायचा होता. यासाठी ती स्थानिक टॅटू आर्टिस्टकडे गेली होती.

आयबॉल टॅटूला स्क्लेरल टॅटू देखील म्हटले जाते. हा शरीरातील एखाद्या भागात बदल करण्याचा अंतिम टप्पा आहे. यामध्ये व्यक्तीच्या डोळ्यातील पांढऱ्या भागाला कायमस्वरूपी डाय करून वेगळा रंग दिला जातो.

25 वर्षीय अ‍ॅलेक्झँड्राने डोळ्यात वेदना होत असल्याचे सांगितल्यानंतर टॅटू आर्टिस्टने तिला या वेदना सामान्य असून, पेनकिलरने नाहीशी होईल असे सांगितले. नकळतपणे अ‍ॅलेक्झँड्राला अंध केल्याने टॅटू आर्टिस्टला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

तपासणीनंतर समोर आले की, डोळ्यांना टॅटू करण्यासाठी बॉडी इंकचा वापर करण्यात आला होता. ज्याचा डोळ्यांशी संपर्क येणे घातक ठरू शकते.

अ‍ॅलेक्झँड्राने दृष्टी परत आणण्यासाठी 3 वेळा उपचार केला. मात्र त्यात यश मिळाले नाही. डॉक्टरांनुसार, तिची दृष्टी परत येणे अवघड आहे.

Leave a Comment