बाजारपेठेत दाखल होणार मारुती सुझुकीच्या 5 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कार


मुंबई : लवकरच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या दोन कार मारुती सुझुकी कंपनी बाजारात उपलब्ध करून देणार असल्यामुळे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये मारुती जोरदार टक्कर देणार आहे. सध्या नव्या नियमांनुसार लहान कारच्या निर्मितींचे प्रमाण कमी होत असून 800सीसीची एक नवी कार कंपनी तयार करत आहे. त्याचबरोबर 1 लीटर इंजिनच्या दूसऱ्या एका कारची निर्मिती केली जात आहे. भारतात सध्या मारुतीची 800 सीसीची अल्टो आणि 1 लीटर इंजिनची सेलेरिओ ही कार विकली जाते.

2020 च्या अखेरीस नवीन तयार होत असलेल्या कारपैकी एक कार बाजारात उपलब्ध होऊ शकते. 1 लीटर इंजिनची आणि YNC कोड नेम असलेली कॉम्पॅक्ट कार सेलेरिओऐवजी बाजारात उतरू शकते. सध्या सेलेरिओ 1 आणि 1.2 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. नव्या 800 सीसी कारचा कोड Y0M असा आहे. ही कार लाँच पुढच्या वर्षी फेस्टिव्हल सिझनपर्यंत केली जाईल. याबाबत माहिती देताना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर केनची आयुकावा यांनी सांगितले की, 800 सीसी कारसह अनेक मॉडेलवर कंपनी काम करत आहे. लहान कार तयार करण्यात सर्वात मोठे खर्च कमी करण्याचे आव्हान असते. यामध्ये सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. एन्ट्री लेव्हलच्या कारसाठीचा खर्च या नियमांमुळे 10 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती आयुकावा यांनी दिली.

ऑटोमोबाइल क्षेत्राची उलाढाल सध्या मंदावली असून लहान शहरे आणि गावांमध्ये एन्ट्री लेव्हल कार खरेदी केल्या जातात. त्यामुळे 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील कारचे उत्पादन पुढच्या दोन तीन वर्षात 50 लाख युनिटपर्यंत होईल. यात नव्या कारचा समावेश असेल अशी माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment