धक्कादायक ! या व्यक्तीने चक्क कापला मांजरीचा कान

प्राण्यांच्या बाबतीत मनुष्य कधीकधी किती क्रुर होऊ शकते, याची कल्पना देखील करता येत नाही. इंग्लंडच्या ग्रिम्सबी शहरात राहणाऱ्या 20 वर्षीय एरॉन जेम्स विलियमसनने चक्क एका मांजरीचा कान कापल्याचे हिंसक कृत्य केले आहे. या प्रकरणात आता एरॉन 3 महिने कारावास आणि दंडाची शिक्षा झाली आहे.

जेम्सनुसार, त्याने लिट्टन नावाचे मांजरीला अनेकदा मारले व तिचा कान कापला.

जेम्सच्या घरात अन्य दोन मांजरींची देखील वाईट परिस्थितीमध्ये सुटका करण्यात आली. आता न्यायालयाने त्याला 3 महिन्यांचा कारावास आणि 20000 रुपये दंड व 9000 रुपये सरचार्ज अशी शिक्षा ठोठावली आहे.

एरॉनने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, त्याला राग आला होता. त्यामुळे मी मांजरीचा कान कापला. मला आठवत देखील नाही, एवढ्या वेळा मी मांजरीला मारले.

एरॉनपासून आता लिट्टन मांजरीची सुटका करण्यात आली असून, आता दुसऱ्या व्यक्तीने तिला दत्तक घेतले आहे.

Leave a Comment