… म्हणून सीएनजी गॅस भरताना गाडीतून उतरावे लागते खाली

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, सीएनजी गॅस भरताना चालकाला गाडीतून उतरावे लागते. मात्र असे का करतात तुम्हाला माहित आहे ? याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

फॅक्ट्री फिटेड सीएनजी सिस्टम नसणे –

सीएनजी पंपावर गाडीतून खाली उतरावे लागते, याचे सर्वात प्रमूख कारण म्हणजे वाहनात फॅक्ट्री फिटेड सीएनजी नसणे. ज्या गाड्यांमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी सिस्टम नसते, त्यात बोनेटच्या आत फिलर नॉझल असते. त्यामुळे अनेकदा फिलर नॉझल कोठे दिले आहे, हे लक्षात येत नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी लोकांना गाडीतून उतरण्यास सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

गॅस सिलेंडरमुळे दुर्घटना –

सीएनजी गाड्यांमध्ये देण्यात आलेल्या गॅस सिलेंडरमुळे देखील लोकांना गाडीतून उतरावे लागते. जर गॅस सिलेंडर लिकेज असेल अथवा दुसऱ्या कारणामुळे दुर्घटना घडली तर लोकांचे प्राण वाचावे, हा यामागे उद्देश असतो.

Image Credited – Amarujala

पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत अधिक धोकादायक –

पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी गाड्यांमध्ये गॅस भरणे अधिक धोकादायक असते. याचे कारण म्हणजे गाड्यांमध्ये वेगळे सीएनजी सिस्टम बसवणे. अनेक ठिकाणी ही सिस्टम व्यवस्थित बसवली जात नाही व यामुळे गाडीत आग लागण्याची शक्यता असते.

Image Credited – Livemint

मीटरचे मॉनिटरिंग –

पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी पंपाचा मीटर थोडा वेगळा असतो. त्यामुळे ग्राहकांसोबत कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून मीटर बघण्यासाठी ग्राहकांना गाडीतून बाहेर येण्यास सांगितले जाते.

Leave a Comment