कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे रुग्ण आता दिल्लीत देखील आढळले आहेत. या खतरनाक व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारांपेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 90 हजारांपेक्षा अधिक जणांना याचा संसर्ग झाला आहे. भारतात आतापर्यंत 5 रुग्णांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्हायरसपासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे, त्याविषयी जाणून घेऊया.

नियमित हात धुवावे –

दिवसभरात नियमित साबण आणि पाण्याने व्यवस्थित हात धुवावे. यामुळे हातावरील किटाणूंपासून सुटका होईल.

लोकांपासून अंतर –

आपल्या आजुबाजूच्या लोकांपासून कमीत कमी 3 मीटर अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. ताप, सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींपासून लांब रहा.

नाक, चेहरा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये –

आपण अनेकदा नाक, चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करत असतो, असे करू नये. आपण अनेक ठिकाणी स्पर्श करत असतो. तेथील व्हायरस हातांद्वारे नाक, चेहरा आणि डोळ्यांद्वारे शरीरात जाऊ शकतात.

शिंकताना वापरा टिश्यू –

आपल्या आजुबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या. शिंकताना टिश्यूचा वापर करावा व नंतर तो टिश्यू कचऱ्यात टाका.

ताप, खोकला-सर्दी असेल तर…-

जर तुम्हाला ताप, खोकला-सर्दी असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. घरीच थांबण्याचा प्रयत्न करावा.

मोबाईल स्क्रीन स्वच्छ ठेवा –

तुमच्या स्मार्टफोनला आठवड्यातून एकदा तरी डिसइंफेटिंग वाइप्सद्वारे स्वच्छ करा. आपल्या हातात सतत असणाऱ्या फोनच्या स्क्रीनवर व्हायरस असतात. स्क्रीनवर मेथिसिलिन रसिस्टेंट स्टेफाय्लोकोक्स ऑरीयास (एमआरएसए) नावाचे किटाणू असतात.

बाथरूम स्वच्छ ठेवावे  –

बाथरूम साफ करताना शॉवरला नक्की साफ करावे. प्लास्टिकच्या पडद्यांचा उपयोग बाथरूममध्ये करू नये. शॉवरमध्ये मॅथालॉबेक्टरसारखे अनेक किटाणू असतात.

विमानातून प्रवास करताना काळजी घ्या –

विमानातील क्रू सदस्यांकडून खाण्याच्या वस्तू घेण्याआधी आपले हात स्वच्छ करावे. विमानातील सदस्यांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता अधिक असते.

दही खा –

जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत असेल तर तुमच्या जेवणात दहीचा वापर करा. दह्यात एसीडोफिलस नावाचा बॅक्टेरिया असतो, जो अनेक प्रकारचे व्हायरस संपवतो.

मास्क घाला –

जर तुम्हाला खोकला, सर्दी असेल तर मास्कचा नक्की वापर करा. बाहेर पडताना मास्क नक्की घालावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment