अ‍ॅपल त्या युजर्संना देणार 3600 कोटींची भरपाई

जर तुम्ही देखील वर्ष 2017 आधी आयफोन खरेदी केला असेल, तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. जुन्या आयफोनला जाणूनबुझून स्लो केल्याने टेक कंपनी अ‍ॅपल आपल्या ग्राहकांना तब्बल 50 कोटी डॉलर (जवळपास 3,600 कोटी रुपये) भरपाई देणार आहे.

जुने आयफोन स्लो केल्याने अ‍ॅपलवर अमेरिकेच्या एका स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता अमेरिकेतील ज्या युजर्सचा आयफोन स्लो झाला होता, त्यांना कंपनी प्रत्येकी 25 डॉलर भरपाई देणार आहे. किती जणांचे आयफोन स्लो झाले होते, याची अचूक आकडेवारी समोर आल्यानंतर ही रक्कम कमी-अधिक होऊ शकते.

वर्ष 2017 मध्ये आयफोन स्लो केल्याबद्दल कंपनीने माफी मागितली होती. या खटल्याचे सेटलमेंट 3 एप्रिल 2020 ला होईल. आयफोन स्लो झाल्याची भरपाई केवळ 21 डिसेंबर 2017 च्या आधी आयफोन 6, 6+, 6एस, 6एस+, आयफोन 7, आयफोन 7+ आणि आयफोन एसई खरेदी केला होता त्यांनाच मिळेल.

2017 मध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर आयफोन स्लो झाल्याचा आरोप अनेक युजर्सनी कंपनीवर केला होता. अ‍ॅपलने नवीन आयफोन खरेदी करावे, यासाठी असे केले होते असा आरोप करण्यात आला होता. भारतीयांना याची भरपाई मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment