बांग्लादेशी क्रिकेटर सौम्यच्या लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ


फोटो सौजन्य नईदुनिया
बांग्लादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याच्या विवाहात चोरट्यांनी धुमाकूळ घालून अनेकांचे मोबाईल पळविल्याचे समजते. सौम्य याने प्रीयोन्ति देवनाथ पूजा हिच्यासोबत केलेल्या विवाहास दिग्गज क्रिकेटर आणि अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. मात्र यावेळी चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल पळविले त्यात वधूच्या वडिलांसह अन्य सात लोकांचा समावेश असल्याचे समजते.

विशेष म्हणजे लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी चोरांना मोबाईल चोरताना रंगे हात पकडले पण चोराच्या साथीदारांनी पाहुण्यांना मारहाण केली. उपस्थित पत्रकारांनी या प्रसंगाचे फोटो काढले पण त्यांना नातेवाईकांनी थांबविले आणि पोलीस बोलावले असेही सांगितले जात आहे.

प्रीयोन्ति खुलना येथील राहणारी आहे. सौम्य सरकारने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत १५ कसोटी, ५५ आंतरराष्ट्रीय वनडे आणि ४८ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात बांग्लादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. लग्नासाठी त्याने क्रिकेट मधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे १ मार्च पासून होत असलेल्या तीन वन डे सामन्यात तो सहभागी झालेला नाही.

Leave a Comment