राजधानी दिल्लीत सापडले दोन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह


नवी दिल्ली – चीन, दक्षिण कोरियामध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस आता देशाची राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण दिल्लीत समोर आले असून या संदर्भातील माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर तेलंगणातही एक रुग्ण कोरोनाने पीडित आढळून आला आहे. जो कोरोनाचा रुग्ण दिल्लीत आढळून आला आहे, तो इटलीतून आल्याचे सांगण्यात येते. दुसरा व्यक्ती दुबईतून आला आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना व्हायरसचे ३ रुग्ण समोर आले होते.

आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना पीडित रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या दोन्ही रुग्णांची स्थिती स्थिर आहे. यापूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या लोकांना कोणालाही भेटण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर परदेशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.

Leave a Comment