या सम्राटाला त्याच्या देशातील नागरिक मानत होते देव

अनेकदा लोक आपल्या कर्तृत्वाने एवढे मोठे होतात की लोक त्यांच्यामध्ये देव शोधू लागतात. काहीजण आपल्या कलेच्या जोरावर असे स्थान मिळवतात तर काहीजण आपल्या कामगिरीने, मदत करून लोकांच्या मनात देवाचे स्थान निर्माण करतात. आज अशाच एका राजाबद्दल जाणून घेऊया, ज्याला त्याच्या देशातील लोक जिंवत देव मानत असे.

Image credited – Amarujala

या राजाचे नाव हॅले सेलासी असून, तो इथोपियाचा अखेरचा सम्राट होता. त्याने जवळपास 45 वर्ष इथोपियावर राज्य केले. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव तफरी ठेवले होते, मात्र नंतर बपतिस्मा केल्यानंतर नाव बदलून हॅले सेलासी ठेवण्यात आले. या नावाचा अर्थ ‘त्रिमुर्तीची शक्ती’ असा होतो.

Image credited – Amarujala

वर्ष 1974 सम्राट हॅले सेलासी यांची सत्ता उलथून लावण्यात आली व त्यांना एक वर्ष महालात बंधक म्हणून ठेवण्यात आले. त्याच महालात त्यांचा मृत्यू झाला.

Image credited – Amarujala

सांगण्यात येते की, सेलासी यांना बंधक बनवणाऱ्या व्यक्तीनेच त्यांची हत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी वर्ष 2000 मध्ये त्यांना ट्रिनिटी कॅथेड्रल येथे पुन्हा दफन करण्यात आले.

Image credited – Amarujala

सेलासी यांना अदीस अबाबाच्या इंपिरियल पॅलेसच्या शौचालयाखाली दफन करण्यात आले आहे, याची माहिती मिळताच, त्यांच्या थडग्याला वर्ष 1992 मध्ये जमिनीतून काढण्यात आले.

Leave a Comment