यापुढे कॅमेऱ्यासमोर कीर्तन करणार नाही – इंदुरीकर


अहमदनगर – काल नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे शिवजयंती निमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी तृप्ती देसाईंनी शनिवारी महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवल्यामुळे महाराज किर्तनात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात कार्यक्रम स्थळी येताच तिथे असलेले सर्व कॅमेरे इंदुरीकरांनी बंद करायला सांगितले.

त्याचबरोबर त्यांनी कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन सुरु करेल चालू करेन, असा पवित्रा घेतला आणि कॅमेरे बंद झाल्यानंतरच त्यांनी किर्तनाला सुरुवात केली. त्यानंतर इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनात कधी कोणाची वेळ बदलेल काही सांगता येत नाही, मी तुम्हाला पंचवीस वर्षे हसवायचे काम केले. आता माझ्यावर रडायची वेळ आली आहे. माणुस मोठा झाला की त्याला संपविण्याची काही लोक पैंजच लावतात, असे म्हटले.

माध्यमांचे कॅमेरे बंद केलेत परंतु, मोबाईलमधील कॅमेरे सुरु असतीलच. अरे एक पट्टी सोडताना जरा विचार करा समोरच्या माणसालाही प्रपंच आहे. त्यालाही कुटुंब आहे, असे भावनिक वक्तव्य इंदुरीकरांनी आपल्या किर्तनात केले. दरम्यान इंदुरीकर महाराजांनी एका किर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली.

Leave a Comment