डाऊनलोडच्या बाबतीत ‘या’ अॅपची व्हॉट्सअॅपला धोबीपछाड


नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे असंख्य प्लॅटफॉर्म सध्या सोशल मीडिया जगतात प्रसिद्ध आहेत. या अॅप्सना डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे अॅप असा समज होता. पण हे अॅप आता डाऊनलोडच्या बाबतीत मागे पडले आहे. जानेवारी २०२०मध्ये, टीक-टॉक अॅपने सर्वाधिक डाऊनलोड करणाऱ्या अॅपमध्ये बाजी मारली आहे. टीक-टॉकने डाऊनलोडच्या बाबतीत व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. जगभरात व्हॉट्सअॅप नव्हे तर टीक-टॉकला पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

टीक-टॉकने नोव्हेंबर २०१९ मध्ये अॅप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोरवर जवळपास १.५ बिलियन अॅप डाऊनलोड मार्क केले आहेत. ज्यात भारतात डाऊनलोडचा सर्वात मोठा भाग आहे. भारत आणि ब्राजीलसांरख्या बाजारात टीक-टॉकची मोठी लोकप्रियता आहे. आपल्या शॉर्ट-व्हिडिओ कन्टेंट प्लॅटफॉर्ममुळे टीक-टॉक यूजर्समध्ये ट्रेंड करतो.

एका रिपोर्टनुसार, नोव्हेंबर २०१९मध्ये भारतात २७७.६ मिलियन टीक-टॉक अॅप डाऊनलोड करण्यात आले होते. जानेवारी २०१९शी तुलना केल्यास, जानेवारी २०२० मध्ये डाऊनलोडच्या संख्येत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंतचा टीक-टॉकचा डाऊनलोड आकडा १८२ कोटींपर्यंत पोहचला आहे. ट्रेंडनुसार, फेब्रुवारी महिन्यात डाऊनलोडची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. टीक-टॉक अॅपला ७.७ मिलियन वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.

Leave a Comment