आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख जवळ येत चालली आहे. 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही देखील अद्याप आधारशी पॅनकार्ड लिंक केले नसेल, तर त्वरित करून घ्यावे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आधार-पॅनकार्ड लिंक करू शकता.
या सहज आणि सोप्या पद्धतीने लिंक कर तुमचे आधार-पॅन

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तेथे लिंक आधार कार्ड असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

त्यानंतर तुमचा पॅन नंबर, नाव आणि आधार नंबरची माहिती द्यावी. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन-आधार कार्ड लिंक होईल.

जर तुमचे आधार आणि पॅनकार्डवरील नाव वेगवेगळे असेल तर तुम्हाला ओटीपीची गरज पडेल. हा ओटीपी आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर येईल. ओटीपी टाकल्यानंतर पॅन-आधार लिंक होईल.
एसएमएसद्वारे देखील तुम्ही आधार-पॅनकार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम UIDPN टाइप करून स्पेस द्यावा लागेल व नंतर आधार-पॅन क्रमांक टाकावा लागेल व हा एसएमएस 567678 अथवा 56161 या नंबरवर पाठवावा.
