सरकार देणार 1 कोटी रुपये, करावे लागेल हे काम

सरकारने वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) आतापर्यंत अनेकदा बदल केले आहेत. आता या संदर्भातच सरकार एक नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहेत. याद्वारे तुम्हाला 1 कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो. या योजनेची सुरूवात 1 एप्रिल 2020 पासून होणार आहे.

सरकार जीएसटी अंतर्गत एका अशा लॉटरीची सुरूवात करणार आहे, ज्यामध्ये दुकानदार आणि खरेदीदार यांच्या व्यवहारातील प्रत्येक बिलाला लकी-ड्रॉमध्ये समावेश करण्याच्या तयारीत आहे. या लॉटरीमध्ये ग्राहक 1 कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकू शकतात.

योजनेत भाग घेण्यासाठी ग्राहकांना कोणतीही वस्तू खरेदी केलेली पावती स्कॅनकरून अपलोड करावी लागेल. यासाठी जीएसटी नेटवर्क एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात यावे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही पावती अपलोड करू शकता. मार्च अखेरपर्यंत हे अ‍ॅप उपलब्ध होईल.

सर्वात आधी एक प्रथम विजेता निवडला जाईल. प्रथम विजेत्याला मोठे बक्षीस मिळेल. त्यानंतर राज्य स्तरावर दुसरा व तिसरा विजेता निवडला जाईल.

या संदर्भात एका अधिकाऱ्यांने सांगितले की, ही लॉटरी योजना ग्राहकांना दुकानदाराकडून प्रत्येक खरेदीची पावती मागण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. याद्वारे सरकारला जीएसटीची चोरी रोखण्यास मदत मिळेल. कोणतीही व्यक्ती यात भाग घेऊ शकते. या लॉटरीमध्ये 1 लाख रुपये ते 1 कोटींपर्यंत बक्षीस मिळू शकते.

Leave a Comment