एकेकाळी भारताची शान होते पाकमधील हे किल्ले

भारताच्या फाळणीनंतर अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या गोष्टी पाकिस्तानमध्ये गेल्या. यातील काही ऐतिहासिक व अलीशान किल्ले देखील होते. एकेकाळी भारताची शान असलेले हे किल्ले आज पाकिस्तानमध्ये आहेत. अशाच काही किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

डेरावर किल्ला –

पाकिस्तानच्या बहावलपूर येथील डेरा नवाब साहिबपासून 48 किमी लांब डेरावर फोर्टला जैसलमेरचे राजपूत राय जज्जा भाटी यांनी बनवले होते. या किल्ल्याच्या भिंती 30 मीटर उंच आहेत. या किल्ल्याचे सर्कल 1500 किलोमीटर आहे. हा किल्ला एवढा अलीशान आहे की चोलिस्तान वाळवंटात अनेक किमी लांबून देखील दिसतो.

Image Credited – Amarujala

अल्तीत किल्ला –

पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगित-बल्टिस्तानच्या हुंजी व्हॅलीतील करीमाबाद येथील अल्तीत फोर्ट जवळपास 900 वर्ष जुना आहे. हा किल्ला हुज्जा प्रांताच्या राजांनी बनवला होता. काही वर्षांपुर्वी आगा खान ट्रस्ट आणि जपानच्या मदतीने या किल्ल्याला दुरूस्त करण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

रोहतास किल्ला –

पाकिस्तानच्या झेलम शहरातील दीना टाउनजवळील रोहतास फोर्टला शेरशाह सुरीने वर्ष 1540 ते 1547 मध्ये बनवला होता. सांगण्यात येते की, हा किल्ला बांधण्यास तब्बल 30 हजार लोक होती. 12 दरवाज्यांच्या या किल्ल्यावर मुघलांचा देखील अधिकार होता.

Image Credited – Amarujala

रॉयल फोर्ट –

जवळपास 20 हेक्टरमध्ये पसरलेल्या लाहोर येथील रॉयल फोर्ट पाकिस्तानमधील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. सांगण्यात येते की वर्ष 1560 मध्ये मुघल बादशाह अकबरने बांधले होते. 1400 फूट लांब आणि 1115 फूट रुंद किल्ल्याचा यूनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

Image Credited – Amarujala

रानीकोट किल्ला –

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जमशोरो येथे रानीकोटचा किल्ला आहे. या किल्ल्याला ‘सिंधची भिंत’ देखील म्हटले जाते. हा किल्ला 32 किमीमध्ये पसरलेला असून, हा जगातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला 20 व्या शतकाच्या सुरूवातीला अथवा सन 836 ला सिंधचे गव्हर्नर पर्सियन नोबल इम्रान बिन मूसा मर्सकी यांनी बनवला होता असे सांगितले जाते. मात्र हा खिल्ला खरं कोणी बनवला, हे कोणालाच माहिती नाही.

Leave a Comment