निवृत्तीनंतर हे काम करणार शारापोव्हा

टेनिसपटू मारिया शारापोव्हाने काही दिवसांपुर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आता शारापोव्हाने एका मुलाखतीमध्ये आपल्या पुढील आयुष्यातील योजनांबाबत माहिती दिली आहे.

मुलाखतीमध्ये मारियाला पुढे ती प्रशिक्षण देणार का ? असे विचारले असता, ती म्हणाली की, मी कोणतेही प्रशिक्षण देणार नाही. तसेच तिने आपण पुन्हा परतणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. अनेकदा महिला टेनिसपटू निवृत्तीनंतर देखील पुन्हा परतल्याचे पाहिला मिळाले आहे. मात्र मारियाने याबाबत नकार दिला आहे.

शारापोव्हा म्हणाली की, प्रत्येक खेळाडुची परिस्थिती वेगवेगळी असते. खासकरून महिला खेळाडूंच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मला माहित नाही, आई झाल्यानंतर इतर खेळाडू दुहेरी जबाबदारी कशी सांभाळतात. मी कधी आई झाले तर स्वतःला खेळताना पाहू शकत नाही. तुम्हाला मुलांसाठी वेळ मिळत नाही.

काही वर्षांपुर्वी डोपिंगमुळे शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यावर ती म्हणाली की, ती वेळ खूपच खराब होती. मात्र मी प्रामाणिकपणे त्याबाबतीत स्वतःचे म्हणणे मांडले. मी परतल्यावर लोकांनी मला आधीप्रमाणेच प्रेम दिले.

वर्ष 2004 साली अवघ्या 17व्या वर्षी शारापोव्हा सेरेनाचा पराभव करत विंम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकत, जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर ती एक ब्रँड झाली होती. फॉर्ब्सनुसार, ती सलग 11 वर्ष सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू होती.

मागील दोन वर्षांपासून ब्रिटनचा उद्योगपती अ‍ॅलेक्झँडर गिलकेससोबत शारापोव्ह रिलेशनमध्ये आहे.  यावर शारापोव्हा म्हणाली की, माझ्या आयुष्यात व्यवसायासोबत अनेक गोष्टी आहेत, ज्या मी आता करेल. अ‍ॅलेक्झँडरचा माझ्या आयुष्यावर चांगला प्रभाव पडला. तो माझ्यासोबत असल्याने मी आनंदी आहे. आता मी त्याला देखील अधिक वेळ देऊ शकेल.

शारापोव्हा तिचा एजेंट मॅक्स एसिनबडकडून सल्ला घेते. मॅक्स म्हणाला की, निवृत्तीनंतर देखील शारापोव्हा नाइकी, इव्हियन आणि पोर्शेसोबत एंडोर्समेंट करार कायम ठेवेल. तिची आवड आर्किटेक्चरचे शिक्षण घेणे आहे. ती आपली कँडी कंपनी शुगरपोवाला पुढे नेण्यास लक्ष देईल.

Leave a Comment