चीनी ऑटो चान्गन भारतीय बाजारात येणार


फोटो सौजन्य बिझिनेस ऑटो
चीनच्या ग्रेटवॉल मोटर्सने भारतात प्रवेश केल्याच्या नंतर लगेचच आणखी एक चीनी ऑटो कंपनी भारतीय बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. चान्गन ऑटो ही प्रामुख्याने एसयूव्ही कार्स साठी प्रसिद्ध असून त्यामुळे भारतीय बाजारात एसयूव्ही निर्मात्यांपुढे नवे आव्हान निर्माण होऊ शकेल असे सांगितले जात आहे. चान्गन ऑटो २०२२-२३ मध्ये भारतीय बाजारात येईल आणि त्यांची पहिली कार एसयूव्ही सीएस ७५ प्लस असेल असे संकेत मिळत आहेत. भारतीय ग्राहकात एसयूव्ही अधिक लोकप्रिय आहेत हे लक्षात घेऊन कंपनी डेब्यू एसयूव्हीनेच करेल असा अंदाज आहे.

चान्गन ऑटोची सीएस ७५ प्लस ग्लोबल मार्केट मध्ये आहेच. गेल्या वर्षी चीन ऑटो शो मध्ये ती प्रदर्शित करण्यात आली होती. भारतीय बाजारात ती दोन मॉडेलसह येईल. पहिल्यात १.५ लिटरचे टीजीडीआय ब्ल्यू व्हेल पेट्रोल इंजिन सहा स्पीड मॅन्यूअल व ऑटो गिअरबॉक्स सह दिले गेले आहे तर दुसरे मॉडेल २.० लिटर टीजीडीआय ब्ल्यूव्हेल पेट्रोल इंजिन सह आहे.

कंपनीने भारतात त्यांचे तात्पुरते कार्यालय सुरु केले असून भविष्यातील संधींचा वेध घेणे, वितरक नेमणे अशी कामे सुरु केली आहेत. सीएस ७५ प्लस हे कंपनीचे बेस्ट सेलर मॉडेल असून याचबरोबर सीएस ३५ ही छोटी एसयूव्ही सुद्धा भारतात लाँच केली जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment