महिलांसाठी विशेष आरोग्यदायी कोबी (कॅबेज)


सध्या भारतामधील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढताना दिसू लागले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननुसार भारतीय महिलांमध्ये अगदी लहान वयातच कर्करोग होताना आढळून येत आहे. स्तनामध्ये अचानक गाठ उद्भाविणे, स्तनातून रक्तस्राव होणे, स्तनाच्या त्वचेवर नारिंगी रंगाचे डाग पडणे, गळ्याजवळीलकिंवा काखेमधील लिम्फ नोड्स न सूज येणे अशी स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे समजली जातात. जीवनशैलीमध्ये होत चाललेले बदल, आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या, आणि काही अंशी आरोग्यास धोकादायक सवयी यामुळे ही कर्करोग उद्भवतो आहे. पण जर या सवयींमध्ये परिवर्तन केले गेले, तर कर्करोग होण्याचा धोका पुष्कळ प्रमाणात कमी होऊ शकतो.

प्रथिनांनी परिपूर्ण पदार्थ, म्हणजेच दूध, दही, पनीर इत्यादींचे सेवन आणि त्याचसोबत ‘क्रुसीफेरस’ भाज्या, प्रामुख्याने कोबी खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. तसेच स्तनाचा कर्करोग झाला असल्यास, त्याच्या उपचारांच्या साईड इफेक्ट्स चा त्रास ही या अन्नपदार्थांमुळे कमी होण्यास मदत होते. कोबी मध्ये असणाऱ्या ग्लूकोसिनोलेट्स नामक तत्वामुळे शरीरातील मेटाबोलिक एन्झाईम्स च्या पातळीमध्ये वाढ होऊन शरीरावरील सूज आणि इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी नियंत्रित होण्यास मदत मिळते.

कोबीच्या सेवनाने टाईप २ डायबेटीस रोखण्यासही मदत मिळते. कोबीमध्ये असणारे वीस निरनिराळे फ्लॅवेनॉइड्स आणि १५ निरनिराळे फेनोल्स उत्तम अँटी ऑक्सिडंट्स म्हणून प्रभावी आहेत. म्हणूनच हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी कोबीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. कोबीमध्ये फायबर देखील मोठ्या मात्रेमध्ये असून त्यामुळे शरीराची पाचनशक्ती सुरळीत राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment