या मुलीचे वयाच्या ६व्या वर्षी ८ लाखाहून अधिक फॉलोअर्स


नवी दिल्ली: मॉडेल बनण्यासाठी मुले आणि मुली बालपणीच सुरुवात करतात. मग ते तरुणाईमध्ये यश साध्य करू शकतात. पण एक ६ वर्षांच्या मुलीने मोठमोठ्या मॉडेलला मागे टाकले आहे. प्रत्येकजण तिचा साधेपणा आणि निळ्या डोळ्यांकडे पाहून वेडा होत आहे. होय, या मुलीला ‘जगातील सर्वात सुंदर मुलगी’ म्हटले जात आहे. सोशल मिडियावर मुलीच्या फोटोंची सध्या चर्चा होत आहे आणि तिचे फॉलोअर्स वाढत आहेत.

रशियातील या लहान मुलीचे नाव अनास्तासिया कोनेजेव्हा आहे. तिच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. निळसर डोळ्याची मुलगी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ही मुलगी आता जगातील सर्वात लहान सुंदर मॉडेल बनली आहे. इंस्टाग्रामवर सलग तिचे फॉलोअर्स वाढत आहेत.

इंस्टाग्रामवर अनास्तासियाच्या फोटोंना खूप पसंती मिळत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या ६व्या वर्षीच तिचे ८ लाखांपेक्षा फॉलोअर्स आहेत. जेव्हा अनास्तासियाला चार वर्षांची होती, तेव्हा तिची आई अॅना यांनी इंस्टाग्रामवर तिच्या नावाने एक खाते उघडले. ही मुलगी दोन वर्षांत इतकी लोकप्रिय झाली की तिचे फॉलोअर्स वाढत आहेत.

ही मुलगी सर्वात मोठा रशियन ब्रँड चोबी किड्ससाठी मॉडेलिंग करते. तिच्या फोटोंवर दररोज हजारो कमेंट्स आणि लाईक्स मिळत असतात. बहुतेक लोक टिप्पणीमध्ये तिच्या डोळ्यांची चर्चा करतात.

Leave a Comment