भारतीयांना सुद्धा व्हावी कोरोनाची लागण; केआरकेचे खळबळजनक ट्विट


चीनमधील कोरोना व्हायरसचा धसका जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. चीननंतर हा व्हायरस आता जगभरातील तब्बल 52 देशांमध्ये पोहचला आहे. या व्हायरसमुळे हजारोच्या संख्येत लोकांनी प्राण गमावले आहेत. संसर्गित भागातून लोकांना रात्रीच्या रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. या संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून लोक मास्क लावल्याशिवाय आणि तोंड झाकल्याशिवाय घरातून बाहेर पडायला सुद्धा कचरत आहे. त्यातच बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षकाने देव करो आणि कोरोनाची लागण भारतात सुद्धा होऊ असे ट्विट केले आहे. नुकतेच केआरके अर्थात कमाल राशिद खानने हे वादग्रस्त ट्विट केले आहे.


आपल्या ट्विटमध्ये कमाल राशिद खान उर्फ केआरके याने कोरोना व्हायरस लवकरात लवकर भारतात यावा अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. असे झाल्यास देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील. आणि कोरोना व्हायरसशी झुंज देतील, असे म्हटले आहे, अर्थात देशात एकटा यावी हा उद्देश काही चुकीचा नाही पण त्यासाठी कोरोनाची लागण व्हावी अशी प्रार्थना करणे म्हणजे जरा अतिच म्हणावे लागेल.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर कमाल खानचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी तर त्याला कोरोनाची सुरुवात झालीच तर तुझ्यापासूनच व्हावी अशा खोचक शब्दात उत्तर देखील दिले आहे. केआरकेने मुळात अशा प्रकारचे ट्विट किंवा वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील त्याने अनेक प्रसंगी अनेक व्यक्तींवर ताशेरे ओढले आहेत आणि आपल्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच कदाचित तो कायम चर्चेत देखील राहिला आहे.

Leave a Comment