निव्वळ बाहुल्यासारखे दिसावे यासाठी त्याने केला कोट्यवधीचा खर्च


रॉड्रीगो अॅल्वीस याने आपला चेहरा अगदी आकर्षक आणि बाहुल्यासारखा दिसावा या हट्टापायी जवळपास कोट्यवधी खर्च करून २० हून अधिक प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. त्याला म्हणूनच आता सगळेच ह्युमन केन डॉल म्हणून ओळखू लागले आहेत. तो काही महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर देखील आला होता.

काही दिवसांपूर्वी रॉड्रीगोला दुबई विमानतळावर पासपोर्टवरच्या फोटोशी चेहरा मिळता जुळता नसल्याचे लक्षात आल्यानंतर अडवण्यात आले होते. रॉड्रीगो हा तेव्हापासून चर्चेत आहे. ३४ वर्षीय रॉड्रीगो वयाच्या १९ वर्षांपासून बाहुल्यासारखे दिसण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्याने शस्त्रक्रियेसाठी आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे.

बाहुल्यासारखे दिसण्यात जरी रॉड्रीगो अॅल्वीसला यश मिळाले नसले तरी कमालीचा बदल त्याच्या चेहरेपट्टीत झाल्यानंतर तो इतर माणसांपेक्षा वेगळाच दिसतो हे कोणीही पटकन सांगू शकतो. याच दरम्यान त्याने आता साईज झिरो फिगर मिळवण्यासाठी आपण आणखी एक शस्त्रक्रिया करणार असल्याचेही सांगितले आहे.

Leave a Comment