… म्हणून दर 4 वर्षांनी येते लीप वर्ष

2020 हे वर्ष लीप वर्ष असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. लीप वर्षात इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस अधिक असतो. मात्र असे का असते तुम्हाला माहिती आहे ?

प्रत्येकी चार वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच वर्षाला 365 दिवसांच्या ऐवजी 366 दिवस असतात. लीप हे दर चार वर्षांनी येते. 2020 आधी हे वर्ष 2016 आणि नंतर 2024 मध्ये येणार आहे.

एक कॅलेंडरचा कालावधी हा पृथ्वीला सुर्याची परिक्रमा पुर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळे एवढा असतो. पृथ्वीला सुर्याभोवती एक फेरी पुर्ण करण्यासाठी जवळपास 365.242 दिवस लागतात. मात्र आपण दरवर्षी अतिरिक्त 0.242 वेळ मोजत नाही. याच अतिरिक्त वेळेला 4 वेळा एकत्र केले तर हा कालावधी एका दिवसा एवढा होता. त्यामुळे दर चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये 1 दिवस अधिक जोडला जातो व ते लीप वर्ष असते.

ग्रेग्रोरियन कॅलेंडरद्वारे यात सुधारण करण्यात आल्या आहेत. हे कॅलेंडर सर्वात प्रथम 1582 मध्ये सादर करण्यात आले होते. ग्रेग्रोरियनच्या आधी ज्यूलियन कॅलेंडर होते. याला ईसा पुर्व 45 मध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये लीप वर्षासाठी वेगळे कॅलेंडर असे.

ज्यूलियन कॅलेंडरमध्ये पृथ्वीला परिक्रमा पुर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे निश्चित ज्ञान नव्हते. त्यामुळे हे कॅलेंडर 10 दिवस मागे पडले होते. 16 व्या शतकात अखेर या चुकीला सुधारण्यासाठी 1582 मध्ये पॉप ग्रेगरी XIII ने थेट 4 ऑक्टोंबरनंतर 15 ऑक्टोंबर तारीख येईल, असा आदेश दिला व ही चुक सुधारली.त्यानंतर पोपने नवीन लीप वर्षाची प्रणाली आणली व त्याला ग्रेग्रोरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले.

लीप वर्ष निश्चित करण्यासाठी त्या वर्षाला 4 या संख्येने पुर्णपणे भाग जाणे गरजेचे असते. उदाहरणार्थ 2000 ला 4 ने पुर्ण भाग जातो. याच क्रमाने 2004, 2008…2020 हे लीप वर्ष ठरतात.

लीप वर्षासाठी दुसरी अट म्हणजे जर एखाद्या वर्षाला 100 ने पुर्णपणे भाग जात असेल, तर ते लीप वर्ष ठरत नाही. मात्र त्या वर्षाला 400 ने विभागले गेले तर ते लीप वर्ष ठरते. उदाहरणार्थ, 1500 या वर्षाला 100 ने विभागले जाते, मात्र 400 ने पुर्ण विभागले जात नाही. मात्र 2000 या वर्षाला 100 आणि 400 दोन्हीने विभागले जाऊ शकते. त्यामुळे याला लीप वर्ष म्हणतात.

Leave a Comment