यशोगाथा : बॅट घेण्यास पैसे नसलेली क्रिकेटर आज गाजवत आहे विश्वचषक

भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत असून, भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने आपल्या लीगमधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात स्पिनर राधा यादवने 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या व संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी राधाला प्लेयर ऑफ द मॅचने देखील सन्मानित करण्यात आले.

राधाने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले होते. तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. मुंबईच्या कोलिवरी भागात 220 फूट घरापासून ते भारतीय संघात प्रवेश करण्यापर्यंतचा तिचा प्रवास संघर्षमय होता.

Image Credited – Amarujala

राधा मूळची उत्तरप्रदेशच्या जौनपूर येथील आहे. प्राथमिक शिक्षण गावातच पार पडले. तिचे वडील प्रकाश चंद्र यादव मुंबईत डेअरी उद्योगासंबंधीत काम करायचे. त्यामुळे तिने देखील वडिलांजवळ येत क्रिकेट कोचिंग घेण्यास सुरूवात केली. तिने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरूवातीला ती मुंबईच्या संघाचा भाग होती. आता ती गुजरातकडून खेळते.

Image Credited – Amarujala

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. गल्लीत स्टंप लावून मुलांबरोबर एकट्या मुलीला खेळताना पाहून आजुबाजूचे लोक नाव ठेवायचे.

Image Credited – Amarujala

4 भावा-बहिणींमध्ये मोठी असलेल्या राधाचे वडील लहानसे दुकान चालवतात. याच लहानशा दुकानाद्वारे त्यांचे घर चालते. अशा परिस्थितीत राधाकडे क्रिकेट किट तर लांबच, बॅट खरेदी करण्यास देखील पैसे नव्हते. तेव्हा ती लाकडाची बॅट बनवून सराव करत असे. घरापासून लांब 3 किमी अंतरावरील स्टेडियममध्ये वडील रोज सायकलने सोडायला जात असे. मात्र आज आपल्या कामगिरीने राधा विश्वचषक गाजवत आहे.

Leave a Comment