या अ‍ॅपमध्ये मिळणार फेसबुक, इंस्टाग्रामसारखे स्टोरीज फीचर

आतापर्यंत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करण्याचा पर्याय मिळत होता. मात्र आता लवकरच लिंकडिनवर देखील स्टोरीज शेअर करता येणार आहेत.

कंपनीने अधिकृतरित्या याबाबतची माहिती असून, कंपनीने सांगितले की या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, लवकरच हे फीचर लाँच केले जाईल. मात्र कंपनीने या फीचरच्या लाँचिंगची तारीख सांगितलेली नाही.

सर्वात प्रथम स्टोरीजचे फीचर स्नॅपचॅटने दिले होते. त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी हे फीचर कॉपी केले. स्टोरिज फीचरबद्दल लिंकडिनने सांगितले की, व्यावसायिक आयुष्यात स्टोरीजबद्दल आम्ही खूप अनुभव घेतले आहेत. स्टोरीजद्वारे स्पेशल क्षण शेअर करणे अधिक सुविधाजनक आणि प्रभावी आहे.

कंपनीने 2018 मध्ये देखील या फीचरचे टेस्टिंग सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र हे फीचर केवळ विद्यार्थ्यांसाठी होते. कंपनीने त्यावेळी या फीचरला ‘स्टुडेंट वॉइस’ असे नाव दिले होते व हे फीचर केवळ अमेरिकन विद्यार्थ्यांसाठीच होते.

दरम्यान, लिंकडिनचे सीईओ जेफ विनर यांनी आपले पद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी प्रोडक्ट सीनियर वॉइस प्रेसिडेंट रयान रोसलँस्की घेतील.

Leave a Comment