फेसबुक-गुगलची पाकिस्तानला धमकी

सोशल मीडिया आणि सर्च इंजिन कंपन्यांवर अनेक देशांमध्ये काही कारणांस्तव प्रतिबंध घालण्यात येतात. मात्र आता पाकिस्तानला फेसबुक, गुगल, ट्विटर या कंपन्यांवर सेंसरशिप लादणे महागात पडणार आहे. पाकिस्तानने आणलेल्या डिजिटल सेंसरशिप कायद्यावरून या कंपन्यांनी पाकिस्तान सरकारला चेतावणी दिली आहे.

फेसबुक, ट्विटर आणि गुगलसह अनेक कंपन्यांच्या ग्रुप आशिया इंटरनेट कोएलिशनने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी देणारे पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, डिजिटल सेंसरशिप कायद्यात बदल न केल्यास कंपन्या पाकमधील आपली सेवा बंद करतील.

या कंपन्यांचा आरोप आहे की, हा कायदा बनवताना कोणत्याही तज्ञाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.

पाकिस्तान सरकारने आणलेल्या कायद्यात आपत्तीजनक कंटेटसाठी कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही व्यक्ती कोणत्याही कंटेटला आपत्तीजनक समजून ते हटवण्यासाठी सोशल मीडिया कंपनीला सांगू शकतो. अपील केल्यानंतर 24 तासांच्या आत कंपन्यांना कंटेट हटवाव लागेल. आणीबाणीच्या काळात हा कालावधी 6 तास असेल. या कायद्यात सब्सक्रायबर, ट्रॅफिक, कंटेट आणि अकाउंट संबंधित माहिती गुप्तचर संस्थांना शेअर करण्यासारख्या तरतुदी आहेत.

नवीन कायद्यानुसार, या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपले स्थायी ऑफिस सुरू करावे लागेल. लोकल सर्व्हर बनवावा लागेल व पाकिस्तानच्या बाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या अकाउंटवर लक्ष ठेवावे लागेल. नियम मोडल्यास 50 कोटी रुपये दंडाची तरतूद देखील आहे.

कंपन्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या कायद्यामुळे 7 कोटी युजर्सची गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होते. या कायद्यात बदल न केल्यास कंपन्या पाकिस्तानमधील सेवा बंद करतील.

Leave a Comment