बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्च पर्यंत जमावबंदी


मुंबई – मुंबईत ९ मार्चपर्यंत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिकारानुसार बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या जमाव बंदीतून विवाह समारंभ आणि त्याच्याशी संबंधित अन्य कार्यक्रम, अंत्यविधीसंबंधिक कार्यक्रम, सहकारी संस्था, कंपन्या संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाच्या कार्यक्रमांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मोर्चा काढणे, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमणे, जमाव करून फटाके फोडणे, बँड याला प्रतिबंध करण्यात आला आहे. बृहन्मुंबई हद्दीत हे आदेश ९ मार्च पर्यंत लागू राहणार आहेत.

त्याचबरोबर या आदेशातून चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावाला वगळण्यात आले आहे.

Leave a Comment